
अमरावती, 27 एप्रिल (हिं.स.) : एमआयएमच्या नगरसेविकेच्या पतीची कॅलर पकडून ५० लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक बडनेरा येथील ईस्लामी चौकात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांच्या तक्रारीवरून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. नगरसेविका नुजहत परविन शाकीर हुसेन (वय ४४ रा. आशीयाना जुनीवस्ती बडनेरा) यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
त्यानुसार मुमताज अकबर खान हा ब्लॅकमेल करून नेहमी ५० लाख रुपयांची मागणी करीत पतीसोबत नेहमी वाद करीत होता. पतीने दुर्लक्ष केले. दरम्यान २४ एप्रिल रोजी पती मस्जीदमध्ये नमाजकरीता जात असतांना मुमताजसह ३ ते ४ युवकांनी त्यांना रस्त्यात अडवून व त्यांची कॅलर पकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे नाही दिले तर संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. तेथून पती तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असताना त्यांना रस्त्यात अडवून मारहाण केली, असा आरोप तक्रारीत केला. त्यावरून पोलिसांनी मुमताज अकबर (वय ४४), फिरोज खान अकबर खान आणि अन्य तीन ते चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल कला आहे.
तर दुसऱ्या बाजूने ऐहफाज खान तजीम खान (वय ३१ रा. ईस्लामी चौक, जुनीवस्ती बडनेरा) यांनी तक्रार दिली. २४ एप्रिलला सायंकाळी शाकीर हुसेन व त्याच्यासोबत अन्य काही युवक ईस्लामी चौकातील आपल्या पानठेल्यावर आलेत. मुमताजने निवडणुक आयोगला जी तक्रार दिली आहे. ती त्याला परत घायला सांग नाही तर त्याला जीवाने मारून टाकणार, असे म्हणून कॅलर पकडली आणि अश्लिल शिवीगाळ व मारहाण केली, असा आरोप तक्रारीत केला. त्या आधारावर पोलिसांनी शाकीर हुसेन अहमद हुसेन, आतीफ जुबेर शहा शाकीर हुसेन, राजीक मास्टर, हाजी इरफान आणि अन्य व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी