डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात वृद्धाची हत्या
डोंबिवली, 29 एप्रिल, (हिं.स.)। डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात झालेल्या निर्घृण हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राहुल जाधव यांच्या वडिलांची लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या करण्यात आली. डोंबिवलीजवळील घारीवली परिस
Photo1


डोंबिवली, 29 एप्रिल, (हिं.स.)। डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात झालेल्या निर्घृण हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राहुल जाधव यांच्या वडिलांची लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या करण्यात आली. डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात मंगळवारी २८ तारखेला रात्रीच्या सुमारास घडली. या हत्येप्रकरणी तीन महिलांसह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घारवली येथील जाधववाडी परिसरात मंगळवारी रात्री राहुल जाधव यांचे भाऊ दिनेश यांना काही तरुणांनी फोन करून बोलावून घेतले. दिनेश येताच 10 ते 15 जणांच्या गटाने त्यांच्यावर टोळक्याने जोरदार हल्ला चढविला. हा वाद सोडवण्यासाठी गेलेले त्यांचे वडील बामा जाधव यांच्यावरही लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी काही मारेकऱ्यांची ओळख पटवली असून तीन महिला आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींमध्ये मयूर पाटील आणि विनोद नावाच्या व्यक्तीचा समावेश आहे. या दोघांसह इतर आरोपींचा शोध सुरू आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली, वादाची पार्श्वभूमी काय होती, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande