दुधना नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक; ट्रॅक्टरसह वाळू जप्त
परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)। सोन्ना परिसरातील दुधना नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर सेलू पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू जप्त केली आहे. या कारवाईत एकूण 5 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मिळालेल्या माहिती
दुधना नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक; ट्रॅक्टरसह वाळू जप्त


परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)। सोन्ना परिसरातील दुधना नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर सेलू पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू जप्त केली आहे. या कारवाईत एकूण 5 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, सेलू पोलिसांचे पथक अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी नदीपात्र परिसरात दबा धरून बसले होते. एक ट्रॅक्टर संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. पोलिसांनी वाहन थांबवून पाहणी केली असता त्यात अंदाजे एक ब्रास वाळू आढळून आली. चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव असे सांगितले. त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा सुमारे 4 लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टर, 1 लाख रुपये किंमतीची लाल रंगाची ट्रॉली आणि अंदाजे 5 हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू असा एकूण 5.05 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस हवालदार काशिनाथ मुलगीर आणि पोलीस अंमलदार कोपनर यांनी संयुक्तपणे केली.

या प्रकरणी पोलिस अंमलदार सुरेश पुलाते यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 48(7)(8) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार काशिनाथ मुलगीर करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande