नांदेडमध्ये नगराध्यक्षा क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स संघाचा विजय
नांदेड, 27 एप्रिल (हिं.स.)माजी नगराध्यक्ष कै. के. रामलू प्रतिष्ठान कुंडलवाडीच्या वतीने येथे टेनिस बॉल क्रिकेट शॉर्ट बॉन्ड्रीचे नाईट सामने आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत अंतिम सामन्यात कुंडलवाडीच्या आर्यन्स संघाने बाजी मारली. नगराध्यक्षा सौ.
नांदेडमध्ये नगराध्यक्षा क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स संघाचा विजय


नांदेड, 27 एप्रिल (हिं.स.)माजी नगराध्यक्ष कै. के. रामलू प्रतिष्ठान कुंडलवाडीच्या वतीने येथे टेनिस बॉल क्रिकेट शॉर्ट बॉन्ड्रीचे नाईट सामने आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत अंतिम सामन्यात कुंडलवाडीच्या आर्यन्स संघाने बाजी मारली.

नगराध्यक्षा सौ. प्रेरणा गजानन कोटलावार, उपनगराध्यक्षा सौ. नेहा शैलेश कावार, सेवा सोसायटीचे माजी चेअरमन साईनाथ उत्तरवार व भाजपाच्या नगरसेवकांनी पुढाकार घेऊन - कुंडलवाडी येथे हे सामने आयोजित केले - होते. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक कै. के. रामलू कोटलावार यांच्या स्मरणार्थ ५५ हजार ५५५ - रुपये, दुसरे पारितोषिक कै. सदाशिवराव प्ऱ्याकावार यांच्या स्मरणार्थ ३३ हजार ३३३ - रुपये, तिसरे पारितोषिक कै. शशिकलाबाई

गोविंदू उत्तरवार यांच्या स्मरणार्थ २२ हजार २२२ ठेवण्यात आले होते. कुंडलवाडी आर्यन्स क्रिकेट संघ आणि सगरोळी क्रिकेट संघाचा अत्यंत रोमांचकारी अंतिम सामना झाला होता.

या अंतिम सामन्यात कुंडलवाडीच्या आर्यन्स संघाने सगरोळी संघाचा ४ धावांनी पराभव करून कुंडलवाडी नगराध्यक्षा क्रिकेट चषक २६ व प्रथम पारितोषिक ५५ हजार ५५५ रुपये पटकावले. द्वितीय पारितोषिक ३३ हजार ३३३ रुपये सगरोळी संघाला तर तृतीय पारितोषिक २२ हजार २२२ देगलूर क्रिकेट संघाला देण्यात आले. या सर्व संघांना मान्यवरांच्या हस्ते कप व रोख रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात आले. नांदेड व तेलंगणा भागातून ५० हून धिक संघ सहभागी झाले होते.

मॅन ऑफ द सिरीज आदिनाथ माने (सगरोळी), बेस्ट फिल्डर शेख अफजल (कुंडलवाडी), बेस्ट बॉलर आतिश अष्टमवार (कुंडलवाडी), बेस्ट कीपर सिराज शेख (कुंडलवाडी), फास्टेस्ट फिफ्टी अरबाज (देगलूर), बेस्ट बॅट्समन विजय (सगरोळी) यांनाही मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देण्यात आले.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande