जळगावात ट्रकने दुचाकीस्वराला चिरडले; तरुणाचा जागीच मृत्यू
जळगाव, 27 एप्रिल (हिं.स.) | जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्क चौफुलीवर सोमवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याने, या अपघातात २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ओम सुनील गिरी (वय २५
अपघात लोगो


जळगाव, 27 एप्रिल (हिं.स.) | जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्क चौफुलीवर सोमवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याने, या अपघातात २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ओम सुनील गिरी (वय २५) असे मयत तरुणाचे नाव असून या घटनेनंतर काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

ओम गिरी हा आपल्या दुचाकीने मानराज पार्क चौफुलीवरून जात असताना, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ओम ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी आणि वाहनधारकांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने मृतदेह तातडीने जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला आहे. भररस्त्यात अपघात झाल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.ओम हा जळगाव जिल्हा दशनाम गोसावी समाज अध्यक्ष रवींद्र गिरी यांचे पुतणे आहेत. या घटनेमुळे ओमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, महामार्गावरील जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande