मधुमित्र मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने आमंत्रित, अंतिम मुदत 4 मेपर्यंत
चंद्रपूर, 27 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने 2026 साठी मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. मंडळाच्यावतीने गेल्या तीन वर्षांपासून ही पुरस्कार योजना सुरू झाली आहे. मधमाशीपालन व्यवसायास गत
मधुमित्र मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने आमंत्रित, अंतिम मुदत 4 मेपर्यंत


चंद्रपूर, 27 एप्रिल (हिं.स.)।

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने 2026 साठी मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. मंडळाच्यावतीने गेल्या तीन वर्षांपासून ही पुरस्कार योजना सुरू झाली आहे. मधमाशीपालन व्यवसायास गती मिळावी व मधपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाने हा उपक्रम सुरू केला आहे.

मधमाशीपालनात अनेक वर्ष काम करणाऱ्या यशस्वी मधपाळांना प्रथम पुरस्कार 11 हजार रुपये, द्वितीय 7 हजार व तृतीय 5 हजार रुपये पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यातील एक पुरस्कार, महिला मधपाळासाठी राखीव आहे. 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून पुणे येथे जाहीर समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील. या पुरस्काराची लिंक मंडळाच्या www.mskvib.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात खादी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात नामांकन अर्ज मिळू शकतील.

इच्छुकांनी आपले नामांकन 4 मे 2026 पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात पाठवावे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा कार्यालय चंद्रपूर येथे, 07172 - 252142 या दूरध्वनी क्रमांकावर तसेच 9607219247, 9322789232 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी गजानन इंगळे यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande