रत्नागिरीत कडक उन्हात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नगरसेविका मेधा कुळकर्णी यांच्याकडून सरबत
रत्नागिरी, 27 एप्रिल, (हिं. स.) : शहरातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्यांच्या स्थलांतराचे काम सुरू असताना कडक उन्हात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरबताचे वाटप करून नगरसेविका सौ. मेधा कुळकर्णी यांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला. नगरपालिकेच्या पाणीप
रस्ता कामगारांना सरबत वाटप


रत्नागिरी, 27 एप्रिल, (हिं. स.) : शहरातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्यांच्या स्थलांतराचे काम सुरू असताना कडक उन्हात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरबताचे वाटप करून नगरसेविका सौ. मेधा कुळकर्णी यांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला.

नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी तसेच मिऱ्या–नागपूर महामार्गावरील कामगार उन्हाच्या तीव्र झळा सहन करत आपले कर्तव्य पार पाडत असताना सौ. कुळकर्णी यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सरबत वाटप करून त्यांच्या श्रमांचे कौतुक केले व त्यांना दिलासा दिला.

या छोट्याशा पण हृदयस्पर्शी उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांकडून या कृतीचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. सेवा आणि संवेदनाशीलता यांचा सुंदर संगम असे म्हणत नागरिकांनी सौ. मेधा कुळकर्णी यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande