
छत्रपती संभाजीनगर, 27 एप्रिल (हिं.स.)।
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष
रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी विभागीय कार्यालय येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत जिल्हा प्रशिक्षण वर्ग योजना कार्यशाळेचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला.
या कार्यशाळेमध्ये संघटन बळकटीकरण, कार्यपद्धती सुधारणा आणि आगामी राजकीय वाटचालीसाठी आवश्यक दिशा व मार्गदर्शन यावर सखोल चर्चा करण्यात आली.
भाजपा परिवाराच्या वतीने देशभरात 'पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान' राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागांची कार्यशाळा संपन्न झाली. छत्रपती संभाजीनगर येथील भाजपा विभागीय पक्ष कार्यालयात झालेल्या या कार्यशाळेला उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
राष्ट्रसेवा सर्वोपरि मानून भाजपा परिवारातील प्रत्येक कार्यकर्ता जनसेवेसाठी कटिबद्ध असतो. याच समर्पण भावनेतून भाजपा परिवाराचे संघटन दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे. या प्रशिक्षण उपक्रमांमुळे कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा व दिशा मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी मंत्री अतुल सावे, प्रदेश सरचिटणीस राजेश देशपांडे, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, आमदार संजय केनेकर, आमदार अनुराधाताई चव्हाण, आमदार नारायण कुचे, माजी खासदार डॉ. भागवत कराड, माजी खासदार प्रीतमताई मुंडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis