ग्रामीण भागातील आर्थिक प्रगतीला हातभार लागणार - आमदार प्रकाश सोळंके
बीड, 27 एप्रिल (हिं.स.)। ग्रामीण भागातील आर्थिक प्रगतीला हातभार लागणार, असे मत आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केले. श्री सिद्धेश्वर अर्बनच्या यशामागे ग्राहकांचा दृढ विश्वास आणि उत्कृष्ट सेवा हीच खरी ताकद आहे. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या विश्वासा
अ


बीड, 27 एप्रिल (हिं.स.)।

ग्रामीण भागातील आर्थिक प्रगतीला हातभार लागणार, असे मत आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केले.

श्री सिद्धेश्वर अर्बनच्या यशामागे ग्राहकांचा दृढ विश्वास आणि उत्कृष्ट सेवा हीच खरी ताकद आहे. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या विश्वासार्ह सेवेमुळे संस्थेची सातत्याने होत असलेली प्रगती आणि ग्राहकांना मिळणारा न्याय हे निश्चितच आश्वासक आहे.

आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की,

१९६६ साली या बँकेची स्थापना झाली, त्या काळात माजलगाव हे खेडेगावाच्या स्वरूपात होते. त्या काळापासून आजपर्यंत ही संस्था भक्कमपणे उभी आहे, यावरून तिची विश्वासार्हता अधोरेखित होते. अनेक संस्था बुडीत गेल्याच्या बातम्या आपण वाचतो, परंतु या संस्थेने कधीही ग्राहकांचा पैसा स्वतःच्या व्यवसायासाठी किंवा वैयक्तिक कारणांसाठी वापरलेला नाही. तसेच, रिझर्व बँकेच्या निकषांनुसार काम केल्यामुळे येथील ठेवी सुरक्षित असल्याचा विश्वास ग्राहकांना आहे.

टाकरवण येथे सिद्धेश्वर अर्बन बँकेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. आतापर्यंत परिसरातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास ही संस्था भविष्यातही निश्चितपणे कायम ठेवेल, असा दृढ विश्वास व्यक्त केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande