नांदेड-स्मार्ट कार्ड नसले तरी पात्र प्रवाशांना सवलतीचा लाभ पूर्वीप्रमाणेच मिळत राहणार
नांदेड, 27 एप्रिल (हिं.स.)महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध सवलत योजनांबाबत पसरत असलेल्या अफवांना पूर्णविराम देत देगलूर आगार व्यवस्थापक संजयकुमार आकुलवार यांनी स्मार्ट कार्ड नसले तरी पात्र प्रवाशांना सवलतीचा लाभ पूर्वीप्रमाणेच मिळत र
नांदेड-स्मार्ट कार्ड नसले तरी पात्र प्रवाशांना सवलतीचा लाभ पूर्वीप्रमाणेच मिळत राहणार


नांदेड, 27 एप्रिल (हिं.स.)महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध सवलत योजनांबाबत पसरत असलेल्या अफवांना पूर्णविराम देत देगलूर आगार व्यवस्थापक संजयकुमार आकुलवार यांनी स्मार्ट कार्ड नसले तरी पात्र प्रवाशांना सवलतीचा लाभ पूर्वीप्रमाणेच मिळत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अलीकडे स्मार्ट कार्ड नसल्यास सवलत बंद होणार अशी चुकीची माहिती काही ठिकाणी पसरत होती. मात्र, प्रशासनाने ही माहिती पूर्णपणे

चुकीची असल्याचे सांगत प्रवाशांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. राज्य परिवहन। महामंडळामार्फत ६५ व ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती तसेच महिलांसाठी सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. विशेषतः महिलांसाठी सुरू असलेल्या ५० टक्के सवलतीच्या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून ग्रामीण भागातील अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.

दरम्यान, देगलूर आगारात स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असली तरी काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक प्रवाशांना अद्याप कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे सवलत बंद होणार का? असा संभ्रम निर्माण झाला होता. आगार व्यवस्थापक आकुलवार यांनी स्पष्ट केले की, महामंडळाच्या कोणत्याही पात्र लाभार्थ्यांच सवलत नाकारली जाणार नाह ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड नाही त्यांनाही ओळखपत्राच्या आधा नियमानुसार सवलत दिली जात आहे आणि पुढेही दिली जाणार आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande