
बीड, 27 एप्रिल (हिं.स.)।
संत नारायणबाबा देवस्थान, वांगी यास नोव्हेंबर २०२२ मध्ये ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला. त्यानंतर देवस्थानच्या भौतिक विकासासाठी भरीव निधी मिळावा यासाठी शासनस्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. अशी माहिती माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली.
या अनुषंगाने सुमारे २ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. अखेर या प्रयत्नांना यश मिळून संत नारायणबाबा देवस्थान, वांगीसाठी २ कोटी ३ लक्ष रुपयांच्या निधीस मान्यता मिळाली आहे, ही आनंदाची बाब आहे. असेही आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले.
या निधीमुळे देवस्थानचा विकास अधिक गतीने होईल आणि भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis