रत्नागिरी : अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव 4-5 मे रोजी
रत्नागिरी, 27 एप्रिल (हिं.स.) : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीअंतर्गत कार्यरत असलेल्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव येत्या 4 आणि 5 मे 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी
अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय सुवर्ण महोत्सव पत्रकार परिषद


रत्नागिरी, 27 एप्रिल (हिं.स.) : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीअंतर्गत कार्यरत असलेल्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव येत्या 4 आणि 5 मे 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी दिली आहे. 50 वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा हा ऐतिहासिक टप्पा विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.

सोमवारी, 4 मे रोजी सकाळी 10 वाजता उद्घाटन समारंभ होणार असून, महाविद्यालयाच्या अर्धशतकातील प्रवासावर आधारित माहितीपट सादर केला जाईल. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पालकमंत्री उदय सामंत आणि चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, माजी विद्यार्थी-शिक्षक मेळावा तसेच गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात हेरंब जोगळेकर, तन्वी मोरे आणि ईशानी पाटणकर यांसारखे माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

मंगळवारी, 5 मे रोजी परफॉर्मिंग आर्ट्स विभागाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल. सायंकाळी 5 वाजता समारोप समारंभ आणि सुवर्ण महोत्सवानिमित्त विशेष स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. या प्रसंगी मंत्री नितेश राणे आणि आमदार किरण सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

या भव्य सोहळ्याचे अध्यक्षस्थान केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक भूषवणार असून, संस्थेचे पदाधिकारी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

------------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande