गोसंरक्षक आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जळगाव तहसील कार्यालयावर गोरक्षा मोर्चा
जळगाव, 27 एप्रिल (हिं.स.)जळगाव येथे विविध गोसंरक्षक आणि हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने तहसील कार्यालयावर गोरक्षा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेत गोमातेच्या जयघोषात आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.
गोरक्षा मोर्चा


जळगाव, 27 एप्रिल (हिं.स.)जळगाव येथे विविध गोसंरक्षक आणि हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने तहसील कार्यालयावर गोरक्षा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेत गोमातेच्या जयघोषात आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनीही सहभाग नोंदवत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविला. मोर्चादरम्यान गोवंश हत्या करणाऱ्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राज्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करणे, अवैध कत्तलखाने तात्काळ बंद करणे, तसेच गोरक्षकांवर होणाऱ्या हल्ल्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे यांचा समावेश आहे.मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, मोठ्या पोलीस बंदोबस्तात हा मोर्चा शांततेत पार पडला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande