देवळा येथे सुमारे ७३ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
बीड, 27 एप्रिल (हिं.स.)। देवळा येथे सुमारे ७३ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले. यावेळी बोलताना आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की, लोकप्रतिनिधी म्हणून देवळा परिसरात भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कायमच कटिबद्ध आहे.
अ


बीड, 27 एप्रिल (हिं.स.)।

देवळा येथे सुमारे ७३ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले. यावेळी बोलताना आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की,

लोकप्रतिनिधी म्हणून देवळा परिसरात भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कायमच कटिबद्ध आहे. ग्रामस्थांच्या मागण्या लक्षात घेऊन विविध विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देता आला, याचा मनापासून आनंद आहे.

भूमिपूजन झालेली कामे :

१)अंबाबाई मंदिर येथे सभामंडप – ₹१० लाख

२) सत्तेवाडी येथे अंगणवाडी इमारत – ₹११.२५ लाख

३)कान्होबाचीवाडी येथे अंगणवाडी इमारत – ₹११.२५ लाख

४)दामोधरवाडी येथे अंगणवाडी इमारत – ₹११.२५ लाख

लोकार्पण झालेली कामे :

१)देवळा बु. येथील स्मशानभूमी सुशोभीकरण – ₹१० लाख

२)दलित स्मशानभूमीकडे जाणारा सिमेंट रस्ता – ₹१० लाख

३)दलित स्मशानभूमी सुशोभीकरण – ₹१० लाख

या प्रसंगी एक महत्त्वाची भावना व्यक्त केली माणूस मरणानंतर त्याला जात नसते. त्यामुळे पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा बदलून, एक माणूस म्हणून सर्वांनी एकाच स्मशानभूमीत अंतिम निरोप देण्याची गरज आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande