परभणी जिल्ह्यात उष्णतेची लाट; नागरिकांनो, निष्काळजीपणा टाळा, काळजी घ्या - जिल्हाधिकारीq
परभणी, 27 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत असून या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. साध्या उ
परभणी जिल्ह्यात उष्णतेची लाट; नागरिकांनो, निष्काळजीपणा टाळा, काळजी घ्या - जिल्हाधिकारीq


परभणी, 27 एप्रिल (हिं.स.)।

जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत असून या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. साध्या उपाययोजनांनीही मोठा धोका टाळता येतो, असे स्पष्ट करत त्यांनी नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला.

विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्ती यांनी अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याची कमतरता आणि उष्णतेचा ताण यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो. चक्कर येणे, अशक्तपणा, डोकेदुखी, उलट्या, जास्त घाम येणे किंवा अचानक बेशुद्धी अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत.आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे--

उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य केंद्रे, दवाखाने व रुग्णालयांनी पूर्ण तयारीत राहून उष्माघातग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा मुबलक साठा ठेवावा. उष्माघात व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष / बेड्स उपलब्ध ठेवावेत. 24x7 आपत्कालीन सेवा कार्यरत ठेवावी. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना उष्माघात उपचाराबाबत सज्ज ठेवावे. गंभीर रुग्णांना तात्काळ उच्चस्तरीय रुग्णालयात रेफर करावे. तसेच कूलिंग सुविधा तत्पर ठेवाव्यात. वैद्यकीय व समवैद्यकीय कर्मचाऱ्यांना उष्माघात ओळख, प्राथमिक उपचार व तत्काळ प्रतिसाद याबाबत प्रशिक्षण द्यावे. नागरिकांमध्ये उष्माघात प्रतिबंधासाठी जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी जिल्हा रुग्णालय तसेच सर्व उपजिल्हा व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande