अंभई येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 27 एप्रिल (हिं.स.) : अंभई येथील श्री वडेश्वर मंदिर मैदानावर सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पुरुष, महिला, युवक आणि बालकांनी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाची सुर
अंभई येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 27 एप्रिल (हिं.स.) : अंभई येथील श्री वडेश्वर मंदिर मैदानावर सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पुरुष, महिला, युवक आणि बालकांनी उपस्थिती दर्शवली

कार्यक्रमाची सुरुवात संत-महंतांच्या भव्य मिरवणुकीने करण्यात आली. त्यानंतर श्री वडेश्वर मंदिर प्रांगणात सामूहिक हनुमान चालीसा पठण, भारत माता पूजन आणि दीपप्रज्वलन करून सोहळ्याचा विधिवत प्रारंभ झाला.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर मार्गदर्शन केले. शबरी आश्रमाच्या साध्वी गायत्री दीदी यांनी बदलत्या सामाजिक परिस्थितीत महिलांनी कुटुंब आणि संस्कृती जपण्याचे आवाहन केले. धर्म जागरण प्रांत प्रचारक सिद्धेश्वर बिराजदार यांनी पंचसूत्रीवर मार्गदर्शन करत पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले.स्वामी भारतानंद सरस्वती यांनी प्रांतवाद आणि भाषावाद दूर करून भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी समाजाने संघटित होण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल काळे यांनी केले, सूत्रसंचालन रोहित गरुड यांनी तर आभार प्रदर्शन राम सोनवणे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचा समारोप सामूहिक हनुमान चालीसा पठणाने करण्यात आला.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande