शिरोलीत अनेक तरुणींचे लैगिंक शोषण; आरोपीस अटक
कोल्हापूर, 27 एप्रिल (हिं.स.)। शिरोली पुलाची ता. हातकणंगले येथील एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून काही तरुणींवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ तयार केल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी एका तरुणीने तक्रार दिल्यानंतर हातकणंगले पोलिस
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शिरोली पोलीस ठाण्याचे प्रभारी  यांना निवेदन


कोल्हापूर, 27 एप्रिल (हिं.स.)। शिरोली पुलाची ता. हातकणंगले येथील एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून काही तरुणींवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ तयार केल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले.

या प्रकरणी एका तरुणीने तक्रार दिल्यानंतर हातकणंगले पोलिसांनी पुलाची शिरोली येथील 22 वर्षीय एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले. या प्रकरणात त्याच्या आणखी दोन साथीदारांचा सहभाग असल्याची चर्चा असूनहा लव जिहाद प्रकार असल्याने याचा सखोल तपास करावा आणि संबंधित आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह सुरेश यादव, माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण, बजरंग दलाचे निलेश शिंदे यांच्या शिष्टमंडळाने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स. पो. नि. सुनिल गायकवाड यानां दिले. तसेच. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गाव बंद पुकारल्याने शिरोली गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

पोलिसांकडून तपास गोपनीय पद्धतीने सुरु आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पुलाची शिरोलीतील एका तरुणाने हुपरी शहरतील एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. या ओळखीचा गैरवापर करत संशयितांनी इतर काही युवतींशी संपर्क साधून सुमारे आठ ते दहा युवतींना जाळ्यात ओढून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओंचा आधार घेत संबंधित युवतींना धमकावण्यात येत होते. हा प्रकार कोणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. मात्र संशयितांच्या जवळच्या मित्रालाच या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्याने या प्रकरणाला वाचा फोडल्याचे सांगितले जाते. यानंतर पीडितांपैकी एका युवतीने धाडसाने पुढे येत तक्रार दाखल केली. हा गुन्हा शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल होताना सपोनि गायकवाड यांनी शिरोलीत यात्रा सुरु असल्याने बंदोबस्त आणि गावात तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवून गुन्हा हातकणंगले पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्याची प्रक्रिया केल्याचे समजते. पण शिरोलीतील हिंदुत्ववादी संघटनानी याचा तपास शिरोली पोलीस ठाण्याकडूनच व्हावा अशी मागणी केली आहे.

हातकणंगले पोलिसांनी तत्काळ हालचाल करत एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अनेक युवतींचे व्हिडिओ असल्याची माहिती समोर येत असून पोलिसांकडून याची पडताळणी सुरु आहे.या संदर्भात हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी एक जण ताब्यात असल्याच्या अधिक तपास सुरु असल्याचे सांगितले.

या प्रकरणात तपास सुरु असून अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पुलाची शिरोली येथे उरुस व यात्रा सुरु असल्याने परिसरात यात्रा सुरु असल्याने परिसरात मोठी गर्दी आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हे प्रकरण हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असले तरी

शिरोलीत बंद पुकारल्याने परिस्थिती तणाव पूर्ण बनली आहे. जिल्ह्यात त्याचे पडसाद पडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande