कोकण धनगर समाजोन्नती मंडळ रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी रामचंद्र आखाडे
रत्नागिरी, 27 एप्रिल, (हिं. स.) : कोकण विभागात धनगर समाजाच्या विकासासाठी स्थापन झालेल्या कोकण धनगर समाजोन्नती मंडळाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी रामचंद्र आखाडे यांची नियुक्ती झाली आहे. धनगर समाजाचे हे पहिले सामाजिक मंडळ असून या मंडळाच्या माध्यमात
रामचंद्र आखाडे


रत्नागिरी, 27 एप्रिल, (हिं. स.) : कोकण विभागात धनगर समाजाच्या विकासासाठी स्थापन झालेल्या कोकण धनगर समाजोन्नती मंडळाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी रामचंद्र आखाडे यांची नियुक्ती झाली आहे.

धनगर समाजाचे हे पहिले सामाजिक मंडळ असून या मंडळाच्या माध्यमातून कोकण विभागातील दुर्लक्षित असलेल्या धनगर समाजाला विकासाची दिशा दाखवण्याचे काम केले जाते. मंडळाचे अनेक समाजनेते, कार्यकर्ते सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत.

गेली काही वर्षे कोकण विभागात या मंडळाचे काम फारच कमी प्रमाणात होत होते. मंडळाला कोकणात संजीवनी देण्यासाठी मंडळाने रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र आखाडे यांच्याकडे सोपवली आहे. श्री. आखाडे रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक काम करत आहेत. त्यांनी धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.

आपल्या नियुक्तीबद्दल श्री. आखाडे यांनी मंडळाचे आभार मानले असून रत्नागिरी जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी आणि मंडळाचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande