
लातूर, 27 एप्रिल (हिं.स.)।
– माजी मंत्री व आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिवंगत माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सोमवारी (दि. २७ एप्रिल) त्यांनी लातूर शहरातील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाटील कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला.
यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, डॉ. पाटील यांनी लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नची पायाभरणी करत शहराला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. शिक्षण क्षेत्रात त्यांनी उभा केलेला आदर्श आजही राज्यभरातील अनेक संस्थांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis