खारगाव-सुरई हद्दीत मोठी कारवाई; गोमांस तस्करी उघडकीस
रायगड, 27 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यातील खारगाव व सुरई गावांच्या हद्दीत म्हसळा पोलिसांनी मोठी कारवाई करत अंदाजे 25 ते 30 किलो गोमांस जप्त केले असून एकाला रंगेहात ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, म्हसळा
Major operation in Khargaon-Surai area; Beef smuggling exposed


रायगड, 27 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यातील खारगाव व सुरई गावांच्या हद्दीत म्हसळा पोलिसांनी मोठी कारवाई करत अंदाजे 25 ते 30 किलो गोमांस जप्त केले असून एकाला रंगेहात ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हसळा शहरातील उभा मोहल्ला येथील सईद मोहम्मद अली पेणकर (वय 57, व्यवसाय प्लंबिंग) याच्यावर गेल्या काही दिवसांपासून गोहत्या करून गोमांस विक्री केल्याचा संशय होता. याबाबत पोलिसांकडून त्याच्यावर गुप्त पाळत ठेवण्यात येत होती.

दि. 26 एप्रिल 2026 रोजी पोलीस कॉन्स्टेबल सागर चितारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. आरोपी आपल्या रिक्षा (MH 06 AL 8304) मधून गोमांस वाहतूक करत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. रिक्षामधून सुमारे 25 ते 30 किलो गोमांस जप्त करण्यात आले असून हे मांस मोरबा येथून म्हसळ्याकडे आणले जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे, उपनिरीक्षक म्हात्रे, पोलीस कॉन्स्टेबल सागर चितारे, अक्षय पुरी तसेच पोलीस हवालदार बांगर यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande