

नाशिक, 27 एप्रिल (हिं.स.) : संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असलेल्या काळाराम मंदिर येथे सोमवारी वैशाख शुक्ल एकादशी निमित्त विशेष धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावात पार पडले.
या पवित्र दिवशी देवांना पंचामृत महाभिषेक करण्यात आला तसेच आंब्याच्या रसाने स्नान घालण्यात आले. त्यानंतर उन्हाळ्याचा विचार करून परंपरेनुसार देवांना फक्त सोवळे नेसवण्यात आले. पुढे केशर, चंदन आणि कापूर उगाळून त्याची उटी लावण्यात आली.
या आकर्षक व भक्तिमय देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी केली होती. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता.
---------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV