अमरावतीत ‘करिअर कट्टा’ उपक्रमासाठी विभागीय कार्यशाळा उत्साहात
अमरावती, 27 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि Maharashtra Information Technology Support Center यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत नावीन्यपूर्ण संकल्पनांना चालना देण्यासाठी अमरावती विभागाची एक दिवसी
युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘करिअर कट्टा’ विद्यापीठात एकदिवसीय विभागीय कार्यशाळा उत्साहात


अमरावती, 27 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि Maharashtra Information Technology Support Center यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत नावीन्यपूर्ण संकल्पनांना चालना देण्यासाठी अमरावती विभागाची एक दिवसीय विभागीय कार्यशाळा उत्साहात पार पडली.

ही कार्यशाळा अमरावती विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर दृकश्राव्य सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यशवंत शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ, मिलींद बाराहाते यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर, अमरावती विभागीय प्राचार्य प्रवर्तक धनंजय तळवणकर विभागीय समन्वयक डॉ. दिनेश खेडकर तसेच डॉ. रंजना जीवने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. रेखा मागिरवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रंजना जीवने यांनी मानले.

या कार्यशाळेला जिल्हा नियोजन समितीचे पदाधिकारी तसेच 125 हून अधिक महाविद्यालयांचे प्राचार्य आणि ‘करिअर कट्टा’ समन्वयक उपस्थित होते. मोठ्या संख्येने झालेल्या सहभागामुळे कार्यशाळेच्या यशात भर पडली असून, विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

----------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande