प्रा. प्रेमनंदा घडसिंग यांना वनस्पती शास्त्र विषयातील भारत सरकारच्या पेटंटची मान्यता
बीड, 27 एप्रिल (हिं.स.)। भाशिप्र संस्थेच्या येथील सिद्धेश्वर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रेमनंदा घडसिंग यांना भारत सरकारचा इथनो बॉटनिकल सर्वे अँड इन विट्रो इव्हॅल्युएशन ऑफ अँटिऑक्सिडेंट प्रॉपर्टीज इन इंडिजिनस इडीबल वा
प्रा. प्रेमनंदा घडसिंग यांना वनस्पती शास्त्र विषयातील भारत सरकारच्या पेटंटची मान्यता


बीड, 27 एप्रिल (हिं.स.)।

भाशिप्र संस्थेच्या येथील सिद्धेश्वर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रेमनंदा घडसिंग यांना भारत सरकारचा इथनो बॉटनिकल सर्वे अँड इन विट्रो इव्हॅल्युएशन ऑफ अँटिऑक्सिडेंट प्रॉपर्टीज इन इंडिजिनस इडीबल वाईल्ड प्लांट्स स्वदेशी खाद्य रानभाज्यांचे वांशिक-वनस्पतिशास्त्रीय सर्वेक्षण आणि त्यांच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांचे इन-विट्रो मूल्यांकन' याबद्दल पेटंट मान्यता मिळालेली आहे.

हा विषय स्थानिक रानभाज्यांच्या वैज्ञानिक आणि पारंपरिक अभ्यासावर आधारित आहे. अशा अभ्यासांमुळे आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या नैसर्गिक वारशाचे शास्त्रीय पुरावे समोर येतात आणि रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित होते. अनेक रानभाज्यांमध्ये बाजारातील भाज्यांपेक्षा जास्त जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. या अभ्यासाला अधिकृत पेटंट मंजूर झाले आहे.: या संशोधनातून भविष्यात नवीन औषधे विकसित करण्याची, व्यवसायिक वापरासाठी संधी मिळते तसेच जैवविविधतेचेही संवर्धन होते. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर, कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, प्रकाश दुगड, आनेवार यांनी त्यांचे अभिनंदन व सत्कार केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande