जिहादच्या षडयंत्राविषयी हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठी जनजागृती अभियान - रमेश शिंदे
* ‘कॉर्पोरेट जिहाद’ विरोधात जनजागृती अभियान विषयावर मुंबई येथे विशेष संवाद ! मुंबई, २७ एप्रिल (हिं.स.) : भारत येथे शरीयतनुसार इस्लामिक शासन नसल्याने ही इस्लामिक शक्तींसाठी काफिरांची भूमी आहे. त्यांना भारतात ''दारुल इस्लाम'' म्हणजे इस्लामचे शासन
हिंदु जनजागृती समिती


रमेश शिंदे


* ‘कॉर्पोरेट जिहाद’ विरोधात जनजागृती अभियान विषयावर मुंबई येथे विशेष संवाद !

मुंबई, २७ एप्रिल (हिं.स.) : भारत येथे शरीयतनुसार इस्लामिक शासन नसल्याने ही इस्लामिक शक्तींसाठी काफिरांची भूमी आहे. त्यांना भारतात 'दारुल इस्लाम' म्हणजे इस्लामचे शासन आणायचे असून त्यासाठी सुरु केलेल्या जिहादला 'गझवा-ए-हिंद’ संबोधित असून भारताला 'खुरासान' हे नाव केव्हाच दिले आहे. हिंदूंच्या विरोधात जिहाद अनेक वर्षापासून सुरु आहे. मात्र नाशिक येथील टीसीएस येथील प्रकरणामुळे कॉर्पोरेट जिहाद काल परवाच चालू झाला आहे, असे हिंदूंना वाटत आहे. वर्ष ७११ पासून मोहम्मद बिन कासिमने आक्रमण केले तेव्हापासून नियोजनबद्ध रीतीने जिहादचे षडयंत्र सुरु झाले आणि ते आजही सुरु आहे. याविषयी हिंदूंमध्ये जागृती नसल्याने जिहाद विरोधात जनजागृती अभियान सुरु केले आहे, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले.

मुलुंड येथे ‘कॉर्पोरेट जिहाद’च्या विरोधात जनजागृती अभियान या विषयावर आयोजित केलेल्या विशेष संवादात बोलत केले. यावेळी हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक कार्यकर्त्या अधिवक्ता (सौ.) प्रीती राऊत आणि सनातन संस्थेच्या सौ.धनश्री केळशीकर यांनीही संबोधित केले. यावेळी हिंदुत्वनिष्ठ आणि युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिंदे पुढे म्हणाले, गेली अनेक वर्षांपासून लव जिहादचे प्रकार सुरु आहेत. हिंदू युवती लव जिहादला बळी पडू नये यासाठी आम्ही 'बेटी बचाव अभियान' सुरु करत आहोत. हिंदूंनी या अभियानात सहभागी व्हावे. परधर्मातील पुरुषाशी विवाह करण्यासाठी ९० दिवस अगोदर आपल्या आई-वडिलांना सांगून त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) सादर करण्याची तरतूद धर्मांतर बंदी कायद्यात गुजरात राज्याने केली आहे, महाराष्ट्र सरकारनेही हे पाऊल उचलावे'.

कॉर्पोरेट जिहादच्या प्रकरणात मदत करणारी यंत्रणा, लोक यांना सुद्धा गुन्ह्याच्या श्रेणीत आणून शिक्षा केली पाहिजे ! - अधिवक्ता प्रीती राऊत

आज हिंदू युवती लव जिहाद आणि धर्मांतराला बळी पडत आहेत, कॉर्पोरेट जिहादची प्रकरणे समोर येत आहेत. त्याला मदत करणारी यंत्रणा, लोक यांना सुद्धा गुन्ह्याच्या श्रेणीत आणले पाहिजे आणि त्यांना शिक्षा केली पाहिजे. मात्र भूतपूर्व आणि वर्तमान सरकार यांच्यामध्ये जिहाद रोखण्याविषयी म्हणावी तशी गंभीरता नाही, असे खेदाने म्हणावे लागते. सरकारने ठरवले तर याची पाळेमुळे नष्ट ते करू शकतात, मात्र तसे होताना दिसत नाही. हिंदू ८०% या देशात आहेत, अन्य २०% साठी हिंदूंना या देशात दाबले जात आहे, ते थांबवले पाहिजे. हिंदूंनी युवतींनी शारीरिक, मानसिक आणि ज्ञानाच्या दृष्टीने सशक्त आणि समर्थ बनले पाहिजे.

सनातन संस्थेच्या सौ.धनश्री केळशीकर म्हणाल्या, ''टीसीएस' सारख्या आस्थापनांमध्ये 'कॉर्पोरेट जिहाद'ची प्रकरणे घडून सुद्धा काही प्रसारमाध्यमांनी असे काही घडले नाही, असे प्रसारीत करून समाजाची दिशाभूल केली आहे. आमची मुले-मुली कोणासोबत जात आहेत याविषयी पालकांनी सजग राहणे आवश्यक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande