
सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)।
जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपरिषदेमध्ये मिळालेल्या घवघवीत यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी २८ एप्रिल रोजी एका भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या भव्य सोहळ्याचे आयोजन सिद्धेश्वर पेठ परिसरातील हरीभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नियोजित जागेची पाहणी करण्यात आली. कार्यक्रमासाठी भव्य स्टेज आणि सभामंडप उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.यावेळीआमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, विविध विभागांचे प्रमुख शासकीय अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड