श्री सदगुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात भाविकांची गर्दी
सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.) :सोलापूरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सम्राट चौक येथील श्री सदगुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात परमपूजनीय श्री इनामदार गुरुजी यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात
grdfgt


सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.) :सोलापूरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सम्राट चौक येथील श्री सदगुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात परमपूजनीय श्री इनामदार गुरुजी यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले.

वैशाख शुद्ध दशमी निमित्त सकाळी मंदिरात धार्मिक विधी, गुरुगीता पारायण तसेच भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ ते १२ या वेळेत भक्तिभावाने भजन सेवा पार पडली. त्यानंतर दुपारी १२ वाजता पारंपरिक पद्धतीने गुलाल अर्पण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

“राजाधिराज सद्गुरुनाथ इनामदार गुरुजी की जय, जय रघुवीर समर्थ” असा जयघोष करत हजारो भाविकांनी गुलाल व पुष्प अर्पण करून गुरुचरणी अभिवादन केले. संपूर्ण मंदिर परिसर फुलांच्या आकर्षक सजावटीने नटला होता.

या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. भाविकांसाठी वांग्याची भाजी आणि खीर असा प्रसाद ठेवण्यात आला होता. सुमारे सव्वा क्विंटल वांग्याची भाजी आणि एक क्विंटल खीर तयार करून मोठ्या प्रमाणात भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. कार्यक्रमाचे आयोजन मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले होते.

-------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande