अमरावतीच्या चीरोडी गावात तीव्र पाणीटंचाई; दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
अमरावती, 27 एप्रिल (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील चीरोडी गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. नगर परिषदेकडून पुरवले जाणारे पाणी गढूळ व अशुद्ध असल्याने गावकऱ्यांच्या आरोग्य
अमरावतीच्या चीरोडी गावात तीव्र पाणीटंचाई; दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात


अमरावती, 27 एप्रिल (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील चीरोडी गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. नगर परिषदेकडून पुरवले जाणारे पाणी गढूळ व अशुद्ध असल्याने गावकऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.

दूषित पाण्यामुळे विविध आजारांचा धोका वाढला असून लहान मुले व वृद्ध सर्वाधिक त्रस्त आहेत. विशेषतः महिला वर्गाला दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. परिस्थिती तात्काळ सुधारली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande