सीईओ कुशल जैन यांनी घेतला बार्शी तालुक्यात विकासकामांचा आढावा
सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी रविवारी बार्शी तालुक्यातील विविध ठिकाणी अचानक भेटी देत विकासकामांची पाहणी केली. या धडक दौऱ्यात त्यांनी पंचायत समिती स्तरावरील कामकाजासह गावपातळीवरील योजन
hgrfg


सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी रविवारी बार्शी तालुक्यातील विविध ठिकाणी अचानक भेटी देत विकासकामांची पाहणी केली. या धडक दौऱ्यात त्यांनी पंचायत समिती स्तरावरील कामकाजासह गावपातळीवरील योजनांचा थेट आढावा घेतला. यावेळी जैन यांनी पाणी पुरवठा योजनांची प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणी मिळत आहे का, याची पडताळणी केली. तसेच ग्रामीण रस्ते विकासाच्या कामांची गुणवत्ता, प्रगती आणि ठेकेदारांची जबाबदारी यावरही त्यांनी लक्ष केंद्रित केले. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देत आरोग्य सेवा, औषधसाठा, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपस्थिती याबाबत सविस्तर माहिती घेतली. काही ठिकाणी आढळलेल्या त्रुटींवर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना देत सुधारणा करण्याचे निर्देश दिले. या अचानक पाहणीमुळे स्थानिक प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली असून, प्रलंबित कामांना गती देण्यासाठी हा दौरा प्रभावी ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande