
लातूर, 27 एप्रिल (हिं.स.)।
लातूरचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड व माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची आज भेट झाली. या भेटीत जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन करून त्यांच्या कारकिर्दीसाठी आ. अमित देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.
मागच्या काळात लातूर येथे अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी आदर्शवत काम केले आहे, नवनवे प्रयोग करून लातूरच्या जडणघडणीत योगदान दिले आहे. कायमस्वरूपी आठवणीत राहणारी कामे त्यांच्या हातून घडली आहेत. जिल्हाधिकारी डॉ.भारत बास्टेवाड यांना लातूर जिल्ह्याची आणि येथील कार्यपद्धतीची चांगली माहिती आहे. माध्यमातूनही लातूरच्या लौकिकाला साजेल असे काम होईल असा विश्वास या प्रसंगी आ अमित देशमुख यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis