पोलीस ठाण्यासमोरच दोन गट भिडले; नेकनूरमध्ये तुफान दगडफेक, ३१ जणांवर गुन्हा दाखल!
बीड, 27 एप्रिल (हिं.स.)। ्जि्ल्हयातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन गट आमनेसामने येऊन तुफान दगडफेक झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सार्वजनिक शांततेचा भंग करून पोलिसांसमक्षच एकमेकांना जिवे मारण्याच्या उद्देशाने ही दगडफेक करण्यात आली. याप्रकर
पोलीस ठाण्यासमोरच दोन गट भिडले; नेकनूरमध्ये तुफान दगडफेक, ३१ जणांवर गुन्हा दाखल!


बीड, 27 एप्रिल (हिं.स.)।

्जि्ल्हयातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन गट आमनेसामने येऊन तुफान दगडफेक झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सार्वजनिक शांततेचा भंग करून पोलिसांसमक्षच एकमेकांना जिवे मारण्याच्या उद्देशाने ही दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बालासाहेब रावसाहेब ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण ११ नामनिर्देशित आणि १५ ते २० अनोळखी अशा ३१ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नेकनूर येथील बसस्थानकासमोरील मोबाईल शॉपीसमोर दोन गटांत भांडण सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तेथे मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी जमाव हटवून वाहतूक सुरळीत केली, मात्र त्यानंतर भांडणातील दोन्ही बाजूंचे १०० ते १५० लोक फिर्याद देण्यासाठी आणि वैद्यकीय पत्रासाठी थेट पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे सरळ उल्लंघन करण्यात आले. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला असता, चिथावणीखोर शिवीगाळ करत जमाव बेकायदेशीरपणे एकत्र आला आणि त्यांनी थेट दगडफेक सुरू केली.

इतर २० जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, १८९, १९०, १९१, १९२, ३५२, ३५१(२), २२३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रामराव रोकडे करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande