रत्नागिरी : टपाल घरीच ठेवणाऱ्या वेळणेश्वरच्या पोस्टमनचे निलंबन
रत्नागिरी, 27 एप्रिल, (हिं. स.) : वेळणेश्वर (ता. गुहागर) येथील पोस्टात आलेले सर्व तऱ्हेचे टपाल गेले दीड वर्ष वितरित न करता घरी ठेवणारे पोस्टमन करन थोरात (बीड) यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोस्ट इन्स्पेक्टर हिमांशु जोशी यांनी दिली. पोस्टमनच
रत्नागिरी : टपाल घरीच ठेवणाऱ्या वेळणेश्वरच्या पोस्टमनचे निलंबन


रत्नागिरी, 27 एप्रिल, (हिं. स.) : वेळणेश्वर (ता. गुहागर) येथील पोस्टात आलेले सर्व तऱ्हेचे टपाल गेले दीड वर्ष वितरित न करता घरी ठेवणारे पोस्टमन करन थोरात (बीड) यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोस्ट इन्स्पेक्टर हिमांशु जोशी यांनी दिली.

पोस्टमनची खातेनिहाय चौकशी सुरू करणार असून ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेऊन हे टपाल वितरित करण्यात येणार आहे. लवकरच वेळणेश्वर पोस्टामध्ये नवीन पोस्टमन नियुक्त केला जाईल, असेही जोशी यांनी स्पष्ट केले.

वेळणेश्वर पोस्ट कार्यालयातून गेले दीड वर्ष आलेले टपाल वितरितच केले नसल्याची बाब समोर आल्याने ग्रामस्थांनी अधिक चौकशीसाठी पोस्टामध्ये चौकशी सुरू केली होती. ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारींमुळे शनिवारी पोस्ट इन्स्पेक्टर हिमांशू जोशी यांनी वेळणेश्वर पोस्ट कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर संबंधित पोस्टमन करन थोरात याला निलंबित करण्यात आल्याचे सांगितले. या प्रकाराची खातेनिहाय चौकशी केली जाणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.दरम्यान, ज्यांचे टपाल वितरित झालेले नाही, असे टपाल बाजूला काढून संबधितांजवळ संपर्क साधला जात आहे. आधारकार्ड, एटीएम कार्ड, बँक पासबुक, चेकबुक, महत्त्वाच्या नोटिसा यांचे वितरण सुरू आहे. ग्रामस्थांनी आपले टपाल वेळेत पोहोचले नसल्याने आपले नुकसान झाले असल्याचा दावा केला आहे. त्यांचे लेखी स्वरूपात म्हणणे घेतले जात आहे. त्यांच्या नुकसानीबाबत वरिष्ठ स्तरावरून जो निर्णय होईल त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल, असेही जोशी यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande