जेवढा पगार मिळतो..तेवढेच बोलले पाहिजे.. आपली ‘लेव्हल’ सोडून बोलू नये, रवी राणांनी घेतला वडेट्टीवारांचा समाचार
अमरावती, 27 एप्रिल (हिं.स.) काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी वायफळ बोलण्यापेक्षा आपल्या मर्यादेत राहून बोलले पाहिजे. त्यांची औकात किती? त्यांची ‘लेव्हल’ काय? वडेट्टीवार काय आहेत, काय नाहीत, हे सगळे मला माहित आहे. त्यांनी काँग्रेसकडून मिळणाऱ्य
जेवढा पगार मिळतो..तेवढेच बोलले पाहिजे.. आपली ‘लेव्हल’ सोडून बोलू नये  आ.राणांनी घेतला विजय वडेट्टीवारांचा समाचार


अमरावती, 27 एप्रिल (हिं.स.)

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी वायफळ बोलण्यापेक्षा आपल्या मर्यादेत राहून बोलले पाहिजे. त्यांची औकात किती? त्यांची ‘लेव्हल’ काय? वडेट्टीवार काय आहेत, काय नाहीत, हे सगळे मला माहित आहे. त्यांनी काँग्रेसकडून मिळणाऱ्या पगारापेक्षा जास्त बोलू नये, अशी बोचरी टीका युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी केली होती टीका

नवनीत राणा आम्हाला चिल्लरच समजतात कारण मोदींना त्या ठोक समजतात. आम्ही चिल्लरच आहोत. त्या किती महान आहेत, कारण त्या ‘सी-ग्रेड’च्या ‘पॉप्युलर हिरोईन’ आहे. त्या पडद्यावरच्या तारांकिता आहे, त्यांच्या दृष्टीने आम्ही चिल्लरच असणार, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना रवी राणा यांनी वडे्टीवार यांच्या वक्तव्याविषयी नाराजी व्यक्त केली.

रवी राणा म्हणाले, माझा विजय वडेट्टीवार यांना एक सल्ला आहे. त्यांच्याही घरी आई, बहीण, मुलगी आहे. महिलांबद्दल कसे बोलले पाहिजे, हे त्यांनी शिकून घ्यावे. ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणाला तुम्ही पाठिंबा देता, हे ठिक आहे. ती काँग्रेसची परंपरा आहे. तुमच्या रक्तात ते आहे. तुम्ही अशा प्रवृत्तींना पाठीशी घालता, तिथपर्यंत ठिक आहे. पण, एका महिलेविषयी वेगळ्या स्तरावर बोलणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. म्हणून माझा विजय वडेट्टीवार यांना सल्ला आहे की आपल्या मर्यादेत नीट-नेटके राहिले पाहिजे. जेवढा पगार मिळतो, तेवढेच बोलले पाहिजे, आपली ‘लेव्हल’ सोडून बोलू नये.

रवी राणा म्हणाले, महाराष्ट्राच्या संस्कृतीत महिलांना नेहमी सन्मानाचे आदराचे स्थान राहिले आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. वायफळ बोलून आपला कचरा वडेट्टीवारांनी करून घेऊ नये. त्यांची आणि माझी अनेकवेळा भेट होते, पुढच्या भेटीत त्यावेळी मी त्यांना नक्कीच समज देईन. मी देखील वरिष्ठ आमदार आहे. एक लहान भाऊ म्हणून मोठ्या भावाला चांगले वागण्याचा सल्ला देईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande