पुण्यात बेकायदा वास्तव्य प्रकरणात तीन बांगलादेशी महिला ताब्यात
पुणे, 27 एप्रिल (हिं.स.)। बुधवार पेठेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी चार कुंटणखाने लाखबंद (सील) केले. बुधवार पेठेतील न्यू वेलकम, बेगम, दाणे आळीतील जुन्या वाड्यातील चार कुंटणखाने पोलिसांनी लाख
bangladesh


पुणे, 27 एप्रिल (हिं.स.)।

बुधवार पेठेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी चार कुंटणखाने लाखबंद (सील) केले. बुधवार पेठेतील न्यू वेलकम, बेगम, दाणे आळीतील जुन्या वाड्यातील चार कुंटणखाने पोलिसांनी लाखबंद केले आहेत. फरासखाना पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी बालकांचे लैगिंक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अल्पवयीन युवतींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुंटणखान्यास जागा उपलब्ध करुन दिल्याने संबंधित सदनिका लाखबंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले होते. कुंटणखान्यासाठी वापरलेल्या सदनिका बंद करण्याचा प्रस्ताव फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी पाठविला होता.

त्यानुसार चार सदनिका लाखबंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलांविरुद्ध कारवाईचे आदेश परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिले होते. बुधवार पेठेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यत आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande