पुण्यामध्ये विशेष मोहीमेत ५८ लाखांचे अमली पदार्थ जप्त
पुणे, 27 एप्रिल (हिं.स.)पुणे पोलिसांच्या परिमंडळ सात परिसरात अमली पदार्थांची विक्री, तसेच तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आले. पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत मेफेड्रोन, गांजा, अमली पदार्थांची भुकटी असा ५८ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल
gfdrdf


पुणे, 27 एप्रिल (हिं.स.)पुणे पोलिसांच्या परिमंडळ सात परिसरात अमली पदार्थांची विक्री, तसेच तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आले. पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत मेफेड्रोन, गांजा, अमली पदार्थांची भुकटी असा ५८ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी विमाननगर, चंदननगर, खराडी, वाघोली, लोणीकंद, लोहगाव भागात १३ कारवाया केल्या. या कारवाईत १९ जणांना अटक करण्यात आली.आरोपींकडून मेफेड्रोन जप्त करण्यात आले असून, त्यांनी राजस्थानातून मेफेड्राेन आणल्याची माहिती तपासात दिली, तपासात आरोपींनी त्यांच्या साथीदारांची नावे सांगितले. राजस्थानातून विशेष पथकाने सहाजणांना अटक केली’, अशी माहिती परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

त्रिस्तन प्रफुल्ल कुलकर्णी (वय ३०, रा. वडगाव शेरी), उबेद अन्सार खान (वय २५, रा. सय्यदनगर रेल्वे फाटकाजवळ, हडपसर), व्यंकटेश गंगाप्पा चव्हाण (वय १९, रा. वडगाव शेरी), सार्थक बलराज खंडाळे (वय १९, रा. वडगाव शेरी), अमित उपदेश यादव (वय २३, रा. वडगाव शेरी), सुमीत संजय लांडगे (वय २५, रा. रामवाडी, येरवडा), प्रवीण पूनमचंद बिझोई (वय २२, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता), योगेश सुभाष कणसे (वय २८, रा. लोणीकंद, अहिल्यानगर रस्ता), नीलेश सदाशिव भोसले (वय ३६, रा. भोसले वस्ती, वाघोली), मनविंदर शंकर सिंग (वय ४२, रा. टिंगरेनगर), रमेश उदाराम सुतार (वय ३४, रा. योजनानगर, लोणीकंद, अहिल्यानगर), पुंजाजी जयवंत चौधरी (वय ४०, रा. जय मल्हार सोसायटी, वाघोली), भगीरथ सजनसिंग पुरोहित (नय २८, रा. मांजरी), आदिनाथ दशरथ शिंदे (वय २९, रा. मांजरी), योगेश लक्ष्मण चव्हाण (रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा), राजेद्र केरु टेळे (वय ३५, रा. चाकण-शिक्रापूर रस्ता, ता. शिरुर), करण सचिन माेहिते (वय २१, रा. सणसवाडी, अहिल्यानगर रस्ता), शबनम हनीफ शेख (वय ३१, रा. भुकन वस्ती, लोहगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande