माझी जी ओळख आहे, ती अजित दादांमुळेच आहे - खा. सोनवणे
बीड, 28 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई आयोजित अजित स्मृती व्याख्यानमालेत खासदार बजरंग सोनवणे यांनी मत व्यक्त केले. खासदार सोनवणे यांनी सांगितले की आज मी राजकारणात जे काही आहे, माझी जी ओळख आहे, ते सर्वस्व आदरणीय अजित
Q


बीड, 28 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई आयोजित अजित स्मृती व्याख्यानमालेत खासदार बजरंग सोनवणे यांनी मत व्यक्त केले.

खासदार सोनवणे यांनी सांगितले की आज मी राजकारणात जे काही आहे, माझी जी ओळख आहे, ते सर्वस्व आदरणीय अजित दादांमुळेच आहे. त्यांनी केवळ व्यक्ती घडवली नाही, तर बीड जिल्ह्याच्या विकासाचे एक व्यापक स्वप्न पाहिले. बीडच्या सर्वांगीण प्रगतीचे स्पष्ट व्हिजन, विकासाची तळमळ आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी — हे सर्व फक्त दादांकडेच होते.

बीड जिल्ह्याचा विकास हा त्यांचा ध्यास होता. सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रेरणादायी वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande