
छत्रपती संभाजीनगर, 28 एप्रिल (हिं.स.)पर्यटन आणि उद्योगातून जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी हाती घेतलेल्या प्रकल्पांना आता मोठी गती मिळाली आहे. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्ग – कनेक्टिव्हिटी वाढवणार आहे! तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे पर्यटनाला नवी झळाळी मिळणार आहे!
जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांवर जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पांची विशेष जबाबदारी सोपवण्यात आली असून, दर पंधरा दिवसांनी कामाचा आढावा घेतला जात आहे. कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही सुरू आहे.आपले महायुती सरकार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. लवकरच धाराशिवची ओळख एक प्रगत आणि समृद्ध जिल्हा म्हणून राज्याच्या नकाशावर झाल्याशिवाय राहणार नाही!
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis