राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे गुरुवारी राज्यभर धरणे आंदोलन
अकोला, 28 एप्रिल (हिं.स.)। अनुसूचित जातींचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची म
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे गुरुवारी राज्यभर धरणे आंदोलन


अकोला, 28 एप्रिल (हिं.स.)। अनुसूचित जातींचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अकोला जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे यांनी दिली आहे.

हे आंदोलनराष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप. तथा संघटनेचे वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार आयोजित करण्यात येत असून, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच समाजातील नागरिकांमध्ये जनजागृती करून या आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, यापूर्वीही 15 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले होते. तरीही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आता राज्यभर आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.ही माहिती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे यांनी दिली.समाज बांधवाची तातडीची बैठक मिटिंग घेऊन हा निर्णय घेतला यावेळी पांडुरंग वाडेकर अरुण परोडकर, मधुकर वानेडकर, प्रविण चोपडे,राम शेगोकार, राम गव्हाळे, श्रीराम राखोंडे, प्रा गजानन पदमने, गजानन काकडे, राजेश परोडकर, हिम्मत वाडेकर, हिम्मत शेगोकार, भगवान पदमने, महादेव इंगळे, गजानन चंदन, अशोक पानझाडें, वासुदेव उंबरकर, बाळकृष्ण पटके, अजय धबाले, भास्करराव शिरभाते, व बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande