अकोल्यात १ मे रोजी बांधकाम मजुरांचा सन्मान सोहळा
अकोला, 28 एप्रिल (हिं.स.)। बिल्डिंग पेंटर्स व बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीने संघर्ष यात्रेत सक्रिय सहभाग घेतलेल्या तसेच इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेत निवृत्तीपर्यंत पोहोचलेल्या जेष्ठ सहकाऱ्यांचा सन्मान सोहळा १ मे
अकोल्यात १ मे रोजी बांधकाम मजुरांचा सन्मान सोहळा


अकोला, 28 एप्रिल (हिं.स.)। बिल्डिंग पेंटर्स व बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीने संघर्ष यात्रेत सक्रिय सहभाग घेतलेल्या तसेच इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेत निवृत्तीपर्यंत पोहोचलेल्या जेष्ठ सहकाऱ्यांचा सन्मान सोहळा १ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा श्रमिक दिनानिमित्त सकाळी ९ वाजता हनुमान चौकजवळ, आपातापा रोड, अकोट रोड, अकोला येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रमिक नेते शैलेश शंकर सूर्यवंशी राहणार आहेत. उद्घाटन जनार्दन खंडेराव (पोलीस स्टेशन, अकोट फैल) यांच्या हस्ते होणार असून प्रमुख मार्गदर्शन गजानन गवई (सचिव, वंचित बहुजन आघाडी, अकोला) करणार आहेत. तसेच मार्गदर्शक म्हणून पंचशील गजघाटे उपस्थित राहणार आहेत. कामगार जीवनाच्या संघर्ष यात्रेत खून-पसीना एक करून लढा देणाऱ्या आणि कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्य घालवलेल्या जेष्ठ सहकाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमास सर्व श्रमिक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भास्कर सोनोने, अनिल वाघमारे, सुनिल तायडे, अक्षय सूर्यवंशी, अनिल येलकर, सचिन तायडे, प्रकाश तेलगोटे, उद्धव ढिसाळे, संदीप नरवणे, विशाल घायवट, राष्ट्रपाल महाजन यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande