जळगाव - तापमानाचा फटका; भाज्यांच्या दरात 20-30 रुपयांची वाढ
जळगाव, 28 एप्रिल, (हिं.स.) - जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 44 अंशांपार गेला आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा थेट परिणाम भाजीपाला उत्पादनावर दिसून येत असून, बाजारात भाज्यांची आवक घटल्याने दरात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या जळगाव जिल्ह्यातील बाजारात बहुता
जळगाव - तापमानाचा फटका; भाज्यांच्या दरात 20-30 रुपयांची वाढ


जळगाव, 28 एप्रिल, (हिं.स.) - जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 44 अंशांपार गेला आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा थेट परिणाम भाजीपाला उत्पादनावर दिसून येत असून, बाजारात भाज्यांची आवक घटल्याने दरात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या जळगाव जिल्ह्यातील बाजारात बहुतांश भाज्यांचे दर प्रति किलो 20 ते 30 रुपयांनी वाढले आहेत. भाजीपाला व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, भेंडी, टमाटे, वांगी आणि हिरवी मिरची यांचे दर सध्या 40 ते 50 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. तर गवार 70 रुपये किलो, फ्लॉवर आणि शेवगा 60 रुपये किलो दराने विक्री होत आहेत. हिरव्या भाज्यांमध्येही दरवाढ जाणवत असून मेथी आणि पालक यांची जुडी 25 ते 30 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

विशेष म्हणजे कोथिंबिरीचे दर तब्बल 120 रुपये किलोवर गेल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. वाढत्या उष्णतेमुळे उत्पादन घटल्याने बाजारातील पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळेच ही दरवाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने भाज्यांची आवक आणखी घटू शकते आणि दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.या परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण वाढला असून, महागाईचा आणखी फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande