अमरावतीत झोन सभापती पदासाठी बुधवारी निवडणूक; राजकीय समीकरणे रंगात
अमरावती, 28 एप्रिल (हिं.स.) : शहरातील नगरसेवकांमध्ये झोन सभापती अर्थात ‘मिनी महापौर’ पदासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली असून, पाचही झोनसाठी निवडणूक उद्या बुधवार, 29 एप्रिल रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीकडे स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने विशेष महत्त्व
नगरसेवकांना आता 'मिनी महापौर' पदांचे डोहाळे पाचही झोन सभापती पर्दासाठी उद्या निवडणूक


अमरावती, 28 एप्रिल (हिं.स.) : शहरातील नगरसेवकांमध्ये झोन सभापती अर्थात ‘मिनी महापौर’ पदासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली असून, पाचही झोनसाठी निवडणूक उद्या बुधवार, 29 एप्रिल रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीकडे स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.

स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया होणार असून, झोननिहाय नगरसेवकांच्या संख्याबळावर निकाल ठरणार आहे. त्यामुळे भाजप, युवा स्वाभिमान पक्ष आणि एमआयएम यांना प्रमुख संधी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. महायुतीतील सहयोगी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसलाही एक झोन मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेससमोर मात्र इतर पक्षांसोबत आघाडी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

झोननिहाय पक्षीय बलाबल:-

झोन 1 (रामपुरी कॅम्प): भाजप – 9, काँग्रेस – 5, राष्ट्रवादी काँग्रेस – 4, इतर – 3 (एकूण 21)

झोन 2 (राजापेठ): भाजप – 9, युवा स्वाभिमान – 4, राष्ट्रवादी – 2, शिवसेना (शिंदे गट) – 1 (एकूण 16)

झोन 3 (दस्तूरनगर): भाजप – 4, बसपा – 3, काँग्रेस – 5, राष्ट्रवादी – 4 (एकूण 16)

झोन 4 (बडनेरा): युवा स्वाभिमान – 7, भाजप – 3, एमआयएम – 3, इतर – 3 (एकूण 16)

झोन 5 (भाजीबाजार): एमआयएम – 9, काँग्रेस – 4, युवा स्वाभिमान – 3, इतर – 2 (एकूण 18)

मतदान पद्धत हात उंचावून होणार असून, काही ठिकाणी बिनविरोध निवडणुकीची शक्यताही व्यक्त केली जात आहे.'

राजकीय चित्र स्पष्ट:

रामपुरी कॅम्प आणि राजापेठ झोनमध्ये भाजपाचे स्पष्ट वर्चस्व असून, येथे सभापतीपद भाजपाकडे जाणे निश्चित मानले जात आहे. बडनेरा झोनमध्ये युवा स्वाभिमान पक्ष मजबूत स्थितीत आहे. भाजीबाजार झोनमध्ये एमआयएम आघाडीवर असून, काँग्रेससोबत पद वाटपाचा फॉर्म्युला लागू होण्याची शक्यता आहे. दस्तूरनगर झोनमध्ये मात्र महायुतीचा एकत्रित निर्णय निर्णायक ठरणार आहे.

एकूणच, उद्याची निवडणूक स्थानिक राजकीय समीकरणांना नवे वळण देणारी ठरण्याची शक्यता आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande