डॉ. वसंत पाटील ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित
रायगड, 28 एप्रिल, (हिं.स.)। : “संघटनेच्या माध्यमातून सगळे एकत्र आल्याने सर्वांचा फायदा होतो. सामाजिक गरजांबरोबरच बौद्धिक गरजही सीएमईच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. वैद्यकीय ज्ञानाबरोबर सामाजिक भान ठेवून काम करणे अधिक महत्त्वाचे आहे. संघटनेच्या सभ
Dr. Vasant Patil honored with ‘Lifetime Achievement Award’


रायगड, 28 एप्रिल, (हिं.स.)। : “संघटनेच्या माध्यमातून सगळे एकत्र आल्याने सर्वांचा फायदा होतो. सामाजिक गरजांबरोबरच बौद्धिक गरजही सीएमईच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. वैद्यकीय ज्ञानाबरोबर सामाजिक भान ठेवून काम करणे अधिक महत्त्वाचे आहे.

संघटनेच्या सभासदांवर दुर्दैवी प्रसंग ओढवल्यास त्यांना आर्थिक मदत केली जाते, ही संघटनेची जमेची बाजू आहे. त्यामुळे पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची एकी कौतुकास्पद आहे,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध डॉ. गिरीश गुणे यांनी केले.

पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने नवी मुंबईतील ताज विवांता हॉटेल येथे आयोजित करण्यात आलेल्या शंभराव्या सीएमई कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. गिरीश गुणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आंतरराष्ट्रीय कामगार नेते व काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, पनवेलचे महापौर नितीन पाटील, माजी महापौर जे. एम. म्हात्रे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अपर्णा पवार, महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी शेकडो डॉक्टर उपस्थित होते. कार्यक्रमात ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. वसंत पाटील यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले, “डॉक्टर मंडळी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करत सामाजिक बांधिलकीही जपत आहेत, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. डॉक्टरांचे जीवन अत्यंत कष्टमय असते. त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते. थोडीशी चूकही डॉक्टरांना महागात पडू शकते. देशात किंवा राज्यात कठीण परिस्थिती निर्माण झाली की डॉक्टरांचे योगदान नेहमीच महत्त्वपूर्ण राहिले आहे. कोरोना काळात हे संपूर्ण जगाने अनुभवले.” आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले, “वैद्यकीय क्षेत्रातील देव मानले जाणारे डॉ. गिरीश गुणे आणि सामाजिक क्षेत्रातील आधारवड माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीमुळे या शंभराव्या सीएमईला चार चांद लागले आहेत.

ही सीएमई नव्या पर्वाची नांदी ठरेल. ताणतणावाच्या आयुष्यात डॉक्टर मंडळी खेळ, मनोरंजन आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आयुष्याचा आनंद घेत आहेत, हे कौतुकास्पद आहे.” यावेळी पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी महेंद्रशेठ घरत यांच्या सहकार्याचा विशेष उल्लेख केला. गेल्या वर्षी खंदेरी-उंदेरी जलदुर्गावर आयोजित स्वच्छता मोहिमेसाठी त्यांनी सुरक्षित प्रवासाची संपूर्ण जबाबदारी पार पाडल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष डॉ. वैभव मोकल, डॉ. संदेश बहाडकर, डॉ. विवेक महाजन, डॉ. आशिष गांधी, डॉ. अमित दवे, डॉ. वैभव पाटील, डॉ. मिलिंद टिपणीस, डॉ. राजेंद्र पटेल, डॉ. दीपक केसरी, डॉ. शीतल सोमवंशी, डॉ. यशवंत भोईर, डॉ. भावेश ठक्कर, डॉ. महेश वाघमारे तसेच सर्व बोर्ड व कोर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande