
बीड, 28 एप्रिल, (हिं.स.)। आष्टी विधानसभा मतदारसंघातील अद्वेतचंद्र निवासस्थानी मतदारसंघातील तीन होतकरू मुलींची महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये यशस्वी निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान केला.
कु. सलोनी कांतीलाल झगडे, रा. सोलेवाडी (ता. आष्टी), कु. संध्या गहिनीनाथ खोटे, रा. मुगगाव (ता. पाटोदा) आणि कु. आरती सुनील गरसुळे, रा. आष्टी (ता. आष्टी) या तिघींनी आपल्या कठोर परिश्रम, चिकाटी आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
मुलींनी शिकावे, स्वावलंबी व्हावे आणि समाजात आपले मानाचे स्थान मिळवावे हेच खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तन आहे. या तिन्ही मुलींना जनसेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या आई-वडिलांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. ज्यांनी आपल्या मुलींना स्वप्न पाहण्याचे व ते पूर्ण करण्याचे बळ दिले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis