बोरखेड येथे नृसिंह जन्मोत्सवाची जय्यत तयारी
नांदेड, 28 एप्रिल (हिं.स.) : तालुक्यातील बोरखेड येथील पुरातन लक्ष्मी-नृसिंह मंदिरात येत्या गुरुवार, 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6:55 वाजता लक्ष्मी-नृसिंह जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन क
बोरखेड येथे नृसिंह जन्मोत्सवाची जय्यत तयारी


नांदेड, 28 एप्रिल (हिं.स.) : तालुक्यातील बोरखेड येथील पुरातन लक्ष्मी-नृसिंह मंदिरात येत्या गुरुवार, 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6:55 वाजता लक्ष्मी-नृसिंह जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात कीर्तन, महाआरती, भजन संध्या तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

बोरखेड येथील हे मंदिर सुमारे साडेतीन वर्षे पुरातन असून त्याची वास्तुकला पेशवेकालीन स्वरूपाची असल्याचे मानले जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात लक्ष्मी-नृसिंह यांची अतिशय सुबक आणि प्राचीन मूर्ती विराजमान आहे.

मागील काही वर्षांपासून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून 2023 पासून या कामाला गती मिळाली आहे. बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील भाविकांच्या आर्थिक मदतीतून मंदिराच्या शिखराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande