आ. सुरेश धस गुरुवर्य नारायण बाबा महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक
बीड, 28 एप्रिल (हिं.स.)। श्री संत गुरुवर्य नारायण बाबा महाराज यांच्या १५ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सप्ताह सांगता प्रसंगी उपस्थित राहिलो. गुरुवर्य नारायण बाबा महाराज यांच्या समा
अ


बीड, 28 एप्रिल (हिं.स.)। श्री संत गुरुवर्य नारायण बाबा महाराज यांच्या १५ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सप्ताह सांगता प्रसंगी उपस्थित राहिलो. गुरुवर्य नारायण बाबा महाराज यांच्या समाधीस्थळी आमदार सुरेश धस नतमस्तक झाले. यानिमित्ताने भाविकांशी संवाद साधत बाबांच्या पवित्र स्मृतींना उजाळा दिला. गुरुवर्य बाबांच्या आशीर्वादामुळेच जनसेवेची संधी मिळाली, ही भावना यावेळी व्यक्त केली. तारकेश्वर गडावर येताच त्या आशीर्वादांची आठवण सदैव जागृत होते.

तारकेश्वर गड हा आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या सीमेवर असून पाथर्डी,शेवगाव,शिरूर कासार,आष्टी सह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात. मात्र, भाविकांना प्रवासासाठी रस्त्यांची अडचण भासत असल्याची जाणीव आहे. यावर उपाय म्हणून राज्य शासनाच्या हॅम योजनेतून महिंदा ते खडकत या रस्त्याच्या सिमेंट काँक्रेटीकरणाच्या कामास मंजुरी मिळाली असून येत्या वर्षभरात या कामास सुरुवात होईल, असा विश्वास नागरिकांना दिला.

या प्रसंगी ह.भ.प. तुकाराम महाराज मुंढे, ह.भ.प. रोहिदास महाराज गर्जे, ह.भ.प. अनिल देवळकर महाराज,राहुल राजळे, विक्रम राजे भोसले, गणेश आव्हाड, अंकुश चितळे, अनिल मोहिते, दिनकर तांदळे, आजिनाथ सानप, सरपंच दहिफळे, माणिक दहिफळे, विठ्ठल गर्जे, शंकर मिसाळ, विष्णु दहिफळे, वसंत मिसाळ तसेच पंचक्रोशीतील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande