परळी नगरपरिषद हद्दीतील पारंपोक तलाव संवर्धन प्रकल्पाची तत्वतः मान्यता रद्द
बीड, 28 एप्रिल (हिं.स.)। राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विविध तलाव संवर्धन प्रकल्पांपैकी परळीतील एक महत्त्वाचा प्रकल्प शासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसा
परळी नगरपरिषद हद्दीतील पारंपोक तलाव संवर्धन प्रकल्पाची तत्वतः मान्यता रद्द


बीड, 28 एप्रिल (हिं.स.)। राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विविध तलाव संवर्धन प्रकल्पांपैकी परळीतील एक महत्त्वाचा प्रकल्प शासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार परळी नगरपरिषद हद्दीतील पारंपोक तलाव संवर्धन प्रकल्पाची तत्वतः मान्यता रद्द करण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे ३.५० कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी सुमारे १.७५ कोटी रुपये शासनाकडून यापूर्वी वितरीत

करण्यात आले होते. मात्र, सुधारित प्रकल्प अहवाल सादर करण्यात दीर्घ विलंब झाल्यामुळे सुकाणू समितीने हा प्रस्ताव रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार शासनाने अंतिम निर्णय घेतला आहे. राज्यभरातील एकूण १४ तलाव संवर्धन प्रकल्पांची मान्यता रद्द करण्यात आली असून, त्यात बीड जिल्ह्यातील हा एकमेव प्रकल्प समाविष्ट आहे. प्रकल्पासाठी वितरीत केलेला निधी व्याजासह शासनाकडे परत जमा करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे जलस्रोत संवर्धनाच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande