
छत्रपती संभाजीनगर, 28 एप्रिल (हिं.स.)।कळंब तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलने १५ पैकी १३ जागांवर दणदणीत विजय मिळवत जनतेचा ठाम विश्वास संपादन केला आहे. विजयी उमेदवारांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हा विजय प्रत्येक कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमांचा, शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांचा आणि विकासाभिमुख विचारसरणीवर असलेल्या विश्वासाचा आहे. जनतेने दिलेला हा कौल म्हणजे आपल्या कामांची पावतीच आहे.
विजयी उमेदवार लक्ष्मण कल्याणराव देशमुख, अशोक विश्वनाथ ईरपतगिरे, अशोक चंद्रभान जगताप, विक्रम भीमराव जाधव, किशोर विनायक पाडे, उत्तम विठ्ठलराव टेकाळे, संतोष बाबासाहेब तौर, संभाजी दगडू वरपे, शंकर संभाजी यादव, गंगाबाऊ साहेबराव गुंड, संजय बबनराव नान्नजकर, किसन एकनाथ जाधव आणि कमलाकर दगडू कसबे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्यावर अधिक मोठी जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणे, संघ अधिक सक्षम व पारदर्शक बनवणे आणि प्रामाणिकपणे कारभार करणे.यावेळी पंचायत समिती सभापती राजश्री वरपे, रामहरी शिंदे, विकास बारकूल, संजय पाटील, दत्ता साळुंके, रामराजे जाधव, त्र्यंबक कचरे, किरण पाटील, मदन बारकूल तसेच कळंब तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis