छ. संभाजीनगर - चार अधिष्ठाता पदांसाठी सोमवारपासून मुलाखती
छत्रपती संभाजीनगर, 28 एप्रिल, (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नऊ संवैधानिक अधिकारी पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. अधिष्ठाता पदासाठी येत्या सोमवारपासून चार मे पासून मुलाखती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अ
छ. संभाजीनगर - चार अधिष्ठाता पदांसाठी सोमवारपासून मुलाखती


छत्रपती संभाजीनगर, 28 एप्रिल, (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नऊ संवैधानिक अधिकारी पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. अधिष्ठाता पदासाठी येत्या सोमवारपासून चार मे पासून मुलाखती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.

कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली संवैधानिक अधिकारी व शिक्षक प्रवर्गाची भरती प्रक्रिया सुरू आहे. संवैधानिक अधिकारी प्रवर्गातील नऊ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी मुलाखती सुरू झाल्या आहेत. यातील धाराशिव उपपरिसर संचालक , संचालक, आजीवन शिक्षण तर संचालक, इनोव्हेशन व इन्क्युबेशन पदासाठी मुलाखत घेण्यात आली. या पदांसाठी अनुक्रमे सहा, १७ व चार जणांनी मुलाखती दिल्या. चार आधिष्ठातापदांसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. कुलसचिव व ज्ञान स्त्रोत केंद्र संचालक पदासाठी वैध-अवैध उमेदवारांची प्राथमिक यादी घोषित करण्यात आली असून, पात्र उमेदवारांची यादी घोषित होणे बाकी आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी १२ उमेदवारांची मुलाखत चार मे, वाणिज्य विद्याशाखेसाठी दोन उमेदवारांची पाच मे, आंतरविद्याशाखेसाठी पाच उमेदवारांची सहा मे, तर मानव्य विद्याशाखेसाठी १२ उमेदवारांची मुलाखत सात मे रोजी घेण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande