महाड तालुक्यात ५.१५ लाखांच्या दागिन्यांची चोरी; गुन्हा दाखल
रायगड, 28 एप्रिल (हिं.स.)। : महाड तालुका पोलीस ठाणे हद्दीतील फोंजदारकोंड-कोंडमालुसरे परिसरात महिलेच्या पर्समधून तब्बल ५ लाख १५ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादी य
Jewelry worth 5.15 lakhs stolen in Mahad taluka; Case registered


रायगड, 28 एप्रिल (हिं.स.)। : महाड तालुका पोलीस ठाणे हद्दीतील फोंजदारकोंड-कोंडमालुसरे परिसरात महिलेच्या पर्समधून तब्बल ५ लाख १५ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादी यांनी आपल्या बॅगमध्ये सोन्याचे दागिने ठेवले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्याने संधी साधून फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या हेतूने पर्समधील दागिने चोरून नेले. चोरीस गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत ५ लाख १५ हजार ५०० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार देसाई करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande