धारणी तालुक्यात पाणीटंचाईवरून संतापाचा उद्रेक; ग्रामसेवकांवर मनमानीचा आरोप
अमरावती, 28 एप्रिल (हिं.स.) : धारणी तालुक्यातील एका गावात भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असून, ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर आरोप होत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांना भर उन्हात वणवण भटकावे लागत असल्याने ग्
कढाव ग्रामस्थांचा पंचायत समितीवर मोर्चा महिलांचा आक्रमक पवित्रा, अधिकारी गैरहजर असल्याने संताप


अमरावती, 28 एप्रिल (हिं.स.) : धारणी तालुक्यातील एका गावात भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असून, ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर आरोप होत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांना भर उन्हात वणवण भटकावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

ग्रामस्थांच्या मते, ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे परिस्थिती अधिकच बिघडली आहे. सरपंच आणि उपसरपंचांना वारंवार डावलणे, त्यांच्या फोन नंबरला ब्लॅकलिस्टमध्ये टाकणे तसेच लग्न दाखले आणि मृत्यू दाखले यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या परिस्थितीला कंटाळून संतप्त ग्रामस्थांनी थेट धारणी पंचायत समितीवर धडक देत बिडीओ कार्यालयावर निषेध नोंदवला. यावेळी कार्यालयात अधिकारी गैरहजर असल्याचे समोर आल्याने नागरिकांचा रोष अधिकच वाढला.

घटनेची माहिती उपसरपंच विनोद पाटणकर यांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांना दिली. माहिती मिळताच ते तातडीने पंचायत समितीत दाखल झाले. मात्र कार्यालयात बीडीओसह अनेक अधिकारी अनुपस्थित असल्याचे पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

ग्रामस्थांनी संबंधित ग्रामसेवकाला तत्काळ बोलावण्याची मागणी केली, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपस्थित नागरिक आणि महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर टीका करत भिलावेकर यांनी जनतेला पाण्यासाठी वणवण फिरावे लागते आणि अधिकारी कार्यालयात उपस्थित नसतात, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे म्हटले.

या वेळी उपसरपंच विनोद पाटणकर, प्रभारी बीडीओ कामाजी ठोंबरे तसेच कढाव गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ग्रामस्थांनी तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची आणि ग्रामपंचायत कारभारात सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande