कुणाल सुनिल वीर यांना 2025-26 चा ‘जिल्हा युवा पुरस्कार’ जाहीर
नंदुरबार, 28 एप्रिल, (हिं.स.) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने दिला जाणारा सन 2025-26 या वर्षाचा ‘जिल्हा युवा पुरस्कार’ कुणाल सुनिल वीर यांना जाहीर झाला आहे. युवा क
कुणाल सुनिल वीर यांना 2025-26 चा ‘जिल्हा युवा पुरस्कार’ जाहीर


नंदुरबार, 28 एप्रिल, (हिं.स.) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने दिला जाणारा सन 2025-26 या वर्षाचा ‘जिल्हा युवा पुरस्कार’ कुणाल सुनिल वीर यांना जाहीर झाला आहे. युवा क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन जिल्हा निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविले आहे. नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे या पुरस्कारासाठी संस्थात्मक गटातून दोन, युवक गटातून

दोन आणि युवती गटातून एक असे एकूण पाच प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावांची छाननी केल्यानंतर

जिल्हा निवड समितीने संस्था आणि युवती गटातील प्रस्ताव अपात्र ठरवले. मात्र, युवक गटातून कुणाल

वीर यांच्या कार्याची गौरवपूर्ण दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे.

विजेत्या युवकास सन्मानचिन्ह, गौरवपत्र आणि 10 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कुणाल सुनिल वीर यांनी पर्यावरण संवर्धन, आरोग्य सेवा, व्यसनमुक्ती अभियान, समाजातील दुर्बल

घटकांना मदत, आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण, कला, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले

आहे. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने सामाजिक कार्य केले आहे, ज्याची दखल घेत

त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येत आहे.

हा पुरस्कार 01 मे 2026 रोजी ‘महाराष्ट्र दिना’च्या मुख्य शासकीय कार्यक्रमात

जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या शुभहस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे

असेही जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande